पुणे - राज्याचे दूग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महादेव जानकर यांच्याकडे ५० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली होती. या तक्रारीनुसार बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करत 5 जणांना ताब्यात घेतले आहे. डॉ. इंद्रजीत भिसे, सचिन पडळकर, दत्ता करे, तात्या कारंडे, विकास अलदर अशी या पाच जणांची नावे आहेत
मंत्री महादेव जानकर यांच्याकडे खंडणी मागणारे ५ जण पोलिसांच्या ताब्यात - minister
रासपचे नेते आणि राज्याचे मंत्री महादेव जानकर आणि शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांच्या संबंधीची क्लिप सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती. यासाठी ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. ३० कोटीवर तडजोड करुन पहिल्या टप्प्यात रु.१५ कोटी रक्कम स्वीकारताना खंडणी मागणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रासपचे नेते आणि राज्याचे मंत्री महादेव जानकर आणि शेळी व मेंढी महामंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांच्या संबंधीची क्लिप सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यासाठी ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात बाळासाहेब रुपनवर यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलिसाकरवी सापळा रचण्यात आला. ३० कोटीवर तडजोड करुन पहिल्या टप्प्यात रु.१५ कोटी रक्कम स्वीकारताना खंडणी मागणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.