महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अग्निशमन आणि पोलिसांना नदी पात्रात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश

पिंपरी-चिंचवड आणि मावळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागल्या आहेत. वाकड येथील कसप्टे वस्ती येथे दोन कुटुंबाला वाकड पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करून सुखरुप बाहेर काढले. तर वाकड येथील स्मशानभूमीमध्ये अडकलेल्या चार तरूणांना पोलीस आणि अग्निशमनच्या जवानांनी बाहेर काढले.

पुणे

By

Published : Aug 5, 2019, 9:29 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहराच्या शेजारून जाणाऱ्या मुळा नदी पात्राच्या लगत राहणाऱ्या कुटुंबाला पाण्यामधून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दल आणि वाकड पोलिसांना यश आले आहे. यात दोन कुत्र्यांचा देखील समावेश आहे. संतोष खरात, शिवम खरात, ज्योती खरात, रजनी यादव आणि पवन यादव असे वाचवण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आणखी चार जणांना वाचवण्यात यश आले आहे.

नदी पात्रालगत असलेल्या घरात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढले

पिंपरी-चिंचवड आणि मावळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागल्या आहेत. वाकड येथील कसप्टे वस्ती येथे दोन कुटुंबाला वाकड पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू करून सुखरुप बाहेर काढले. तर वाकड येथील स्मशानभूमीमध्ये अडकलेल्या चार तरूणांना पोलीस आणि अग्निशमनच्या जवानांनी बाहेर काढले.

पावसाचा जोर वाढत असल्याने परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुळशी आणि पवना ही दोन्ही धरणे १०० टक्के भरल्याने या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढत असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, नदी काठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड, मोरया गोसावी आणि सांगवीमध्ये पाणी शिरले असून या भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, आपत्ती व्यवस्थापनाने ४० ते ४५ कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details