महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिगवण येथे कुंटणखान्यावर कारवाई, दोन महिलांची सुटका - Police raid prostitution business

पोलिसांनी भिगवण येथील कुंटणखान्यावर कारवाई केली. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली.

Police Action on Kuntankhana at Bhigwan
भिगवण येथे कुंटणखान्यावर कारवाई, दोन महिलांची सुटका

By

Published : Dec 26, 2020, 4:36 PM IST

बारामती-इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे लोकवस्तीत अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई करून दोन महिलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत रोख रकमेसह 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मिनीनाथ रमेश गायकवाड ( वय 28, सध्या रा.बारामती रोड, मदनवाडी,ता इंदापूर) व रोहिदास गंगाराम दराडे( वय 29,रा. अकोले.ता इंदापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पथकाची नियुक्ती करून टाकला छापा -

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना बातमीदारामार्फत पुणे-सोलापूर महामार्गाच्या लगत असणाऱ्या रहिवाशी इमारतीत अवैधपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे माने यांनी पोलिसांच्या एका पथकाची नियुक्ती करत या ठिकाणी तातडीने छापा टाकला. यावेळी आरोपी मिनीनाथ गायकवाड, रोहिदास दराडे दोन महिलांकडून अवैधपणे कुंटणखाना चालवित असल्याचे निदर्शनास आले.

दोन महिलांची केली सुटका -

पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोन्ही आरोपींना अटक केली. यावेळी आरोपी वापरत असलेले मोबाईल व रोख रक्कम मिळून 28 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार नाना वीर, महिला पोलीस नाईक जाधव यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details