पुणे -जुन्नर तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागात शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने डोंगराळ भागातील पाऊसाच्या वातावरणावर तयार केलेली "खेळू करू शिकू" कविता दुसरीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. पुणे जिल्हातील जुन्नर तालुक्यात करंजाळे या गावात शिक्षणाचे धडे देणारा उत्तम सदाकाळ गुरुजी कवी म्हणुन वारसा असणारे आहेत. डोंगराळ आदिवासी भागातील वातावरण, वातावरणातील बदल, पावसाच्या सरी असे मन प्रसन्न करुन मनाला गारवा देणारे शब्द सदाकाळ गुरुंजीनी एक वटुन कविता केली आहे. ही कविता मुलांच्या मनावर राज्य करत आहे.
ग्रामिण भागातुन शिक्षणाचा प्रवास करत असताना अडचणी, अपार कष्टाचा असाच असतो. येथे सर्व सुखसुविधा उपलब्ध होत नाहीत. मात्र, शिक्षणाची जिद्द व चिकाटी ही मनात ठेवुन शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असते. या कवीतेच्या माध्यमातून मुलांना काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला असुन आता मी तयार केलेली कविताच मीच मुलांना शिकवणार असल्याचा एक वेगळा अनुभव मिळत असल्याचे ही उत्तम सदाकाळ यांनी सांगितले. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत घरात कुणीच शिकलेले नव्हते. सर्व अशिक्षीत होते त्यामुळे माझ्यात शिक्षणाची उणीव राहिली ती उणीव भरुण करण्याचा प्रयत्न करत आहे.