महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टोलमध्ये सूट नसल्याने पीएमपीएल सेवा बंद; प्रवाशांचा आंदोलनाचा इशारा - पुणे-सातारा मार्ग टोल नाका

पुणे-सातारा मार्गावरील पीएमपीएमएल बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना मात्र नाहक सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी पीएमपीएमएल सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

pmpml service stop due to high toll rate on pune satara highway in pune
टोलमध्ये सूट नसल्याने पीएमपीएल सेवा बंद; प्रवाशांचा आंदोलनाचा इशारा

By

Published : Nov 7, 2020, 3:07 PM IST

पुणे - सातारा रस्त्यावरील खेडशिवापूर येथील टोल शुल्कात सूट मिळत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून पुणे-सातारा मार्गावरील पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यात आली आहे. पीएमपीएमएल आणि टोलनाका व्यवस्थापन यांच्या वादात प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून वैतागलेल्या प्रवाशांनी पीएमपीएमएल सुरू न झाल्यास महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे.

स्थानिक प्रवाशांची प्रतिक्रिया


पीएमपीएमएल सेवा लवकर सुरू करा नाहीतर रास्ता रोको करू-


पुणे सातारा महामार्गावर मागील सहा महिन्यांपासून एकदाही पीएमपीएमएलची बस प्रवाशांना घेऊन धावलेली नाही. त्याचे कारण म्हणजे खेडशिवापूर टोल नाक्यावर पीएमपीएमएलच्या बसला टोलमध्ये सूट नाकारण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणअंतर्गत असलेल्या पुणे-सातारा मार्गावरील 10 ते 12 गावातील प्रवाशांची पीएमपीएमएलची सेवा बंद आहे.


पीएमपीएमएल सेवा लवकर पूर्ववत करू; मात्र सध्या टोल परवडत नाही-

लॉकडाऊननंतर बस सुरू करण्यात आली होती. पण टोल शुल्कात सूट नसल्याने पीएमपीएमएल बस गेली नाही. त्यात एसटी बसची सेवाही मर्यादित आहे. याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसल्याने नोकरदार, व्यवसायिक, दूध-भाजीपाला विक्रते यांना ज्यादा भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. बससेवा सुरू करण्याची मागणी गावकरी सातत्याने करत आहेत. मात्र, पीएमपीएमएल आणि टोल व्यवस्थापन टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या गावकऱ्यांनी पीएमपीएमएल बससेवा चालू नाही झाली, तर महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान सध्या पूर्ण क्षमतेने बस सेवा चालू नसल्याने भार पडतो आहे. त्यामुळे टोलचा वाढीव दर कमी करावा, अशी मागणी पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पीएमपीएमएल बरोबर वाद नाही, जो टोल आहे तो देऊनच बस पुढे जाऊ शकते, असे खेडशिवापूर टोल व्यवस्थपनाचे म्हणणे आहे.

हेही वाचा- विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी राज्यपालांकडे सादर; निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details