पुणे- वाढत्या कोरोनामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपीएमएलही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी अत्यावश्यक सेवेसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कोविड रुग्णालय, तसेच लसीकरण केंद्र येथेही पीएमपीएमएलचे कर्मचारी काम करत आहे. पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेत ही पीएमपीएमएलचे चालक वाहक हे विविध रुग्णालयात कोविडचे काम करत आहे. त्याचबरोबर पीएमपीएमएलकडून कायमस्वरूपी असलेल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसआड कामावर बोलावून विविध दैनंदिन कामकाजासह डेपोची स्वच्छता देखील केली जात आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.
अत्यावश्यक सेवेसाठी 125 बसेस
3 एप्रिलपासून वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील पीएमपीएमएल बंद करण्यात आली आहे. पीएमपीएमएलच्या 1 हजार 800 बसेसपैकी 125 बसेस हे अत्यावश्यक सेवेसाठी वापरले जात आहे. त्याचबरोबर 2 हजार 500 हून अधिक कर्मचारी हे दोन्ही महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये काम करत आहे. पीएमपीएमएलमध्ये तब्बल 10 हजारहून अधिक कामगार करत आहे. त्यातील काही अत्यावश्यक सेवेसाठी तर काही कोविड सेंटरमध्ये तर काहींना दिवसाआड बोलावून विविध डेपोतील काम करत आहे.
शहरात पीएमपीएमएल सुरू करणार कुरिअर सेवा