महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोदी शनिवारी सीरमला भेट देणार, प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाली बैठक

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती लस तयार केली जात आहे. त्या लसीची निर्मितीची प्रक्रिया कुठेपर्यंत आली आहे हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Nov 26, 2020, 4:41 PM IST

Updated : Nov 26, 2020, 7:15 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. यासंदर्भात आज प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दौरा पक्का असल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांच्या बैठकीत दौऱ्याविषयी आणि सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली. सीरमला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी हैदराबाद दौऱ्यावर जाणार आहेत.

सौरभ राव मोदींच्या पुणे दौऱ्याची माहिती देताना
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरती लस (वॅक्सिन) तयार केले जात आहे. त्या लसीची निर्मितीची प्रक्रिया कुठेपर्यंत आली आहे हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी आज एक बैठकही आयोजित करण्यात आली होती.लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात -


ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोना लसीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट मध्ये करण्यात येणार आहे. कोविशिल्ड या लसीच्या चाचण्या सध्या अंतिम टप्प्यात आहेत.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होणार लस -

ऑक्सफोर्ड अ‌ॅस्ट्राझेन्का ही कोरोनावरील लस सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि ज्येष्ठांना फेब्रुवारी २०२१ मध्ये मिळेल. त्यानंतर एप्रिलमध्ये सर्वसामान्यांना लस मिळेल. कोरोना लसीच्या दोन डोसची किंमत जास्तीत जास्त १ हजार रुपये असणार आहे. कोरोनाची लस २०२४ पर्यंत देशातील सर्वांना मिळेल, असे अदार पुनावाला यांनी नुकतेच सांगितले. तर, कोरोनाची लस देशातील सर्वांना मिळण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागण्याची शक्यता आहे. फक्त पुरवठाच नव्हे तर बजेट, लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या कारणाने लस प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे. भारत सरकारला ही लस ३ ते ४ डॉलरला मिळणार आहे. कारण, भारत मोठ्या प्रमाणात लस खरेदी करणार आहे. कोरोनाच्या इतर लसीहून आमच्या लसीची किंमत कमी असेल, असेही पुनावाला यांनी सांगितले.

सीरमसह आयसीएमआर घेणार कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी-

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) आणि आयसीएमआरने लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. या चाचणीसाठी देशातील १,६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. सीरम आणि आयसीएमआर या दोन्ही संस्था संयुक्तपणे कोरोनावरील लसीच्या वैद्यकीय चाचण्या देशात घेणार आहेत. चाचणीचा खर्च सरकारी संस्था असलेली आयसीएमआर करत आहे. तर कोव्हिशिल्ड लसीवरील इतर खर्च हा सीरमकडून केला जात आहे. एसआयआय आणि आयसीएममारकडून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या देशातील १५ विविध केंद्रांवर घेण्यात येत आहे. त्यासाठी लागणाऱ्या १,६०० स्वयंसेवकांची नोंदणी ३१ ऑक्टोबरला करण्यात आली आहे.

पुण्यावरून हैदराबादला जाणार मोदी

पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी हैदराबाद दौऱ्यावर जाणार आहेत. हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर मोदी हैदराबादेत येणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मोदींच्या दौऱ्याची पूर्ण माहिती दिली. कोरोना नियमावलीचे पालन करत मोदींचा पुण्यातील दौरा पार पडणार आहे. हॅलिकॉप्टरनेच मोदी सिरम इन्स्टिट्यूटला जाणार आहेत. १ तासाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते हैदराबादकडे रवाना होणार आहेत.

Last Updated : Nov 26, 2020, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details