पुणे :
मागील वेळी मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील उद्घाटनाला एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे रोल वेगळे होते. आता वेगळे रोल आहेत. आम्ही पुण्याच्या स्वप्नांसाठी एकत्र आलो आहोत. मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पुण्याला आम्ही देशात सर्वोत्तम शहर करून दाखवू व वाहतूक कोंडीची समस्या सोडवू, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला.
Live update
- गेल्या नऊ महिन्यात मोदी चार वेळा महाराष्ट्रात आले आहेत. केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे राज्य पुढे जात आहे. विकासाला साथ देण्यासाठी अजित पवार यांचे तिसरे इंजिन जोडले आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी निधी मिळत असतो. राज्याच्या सर्वांगीण विकास होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
- टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले जाते. महात्मा गांधींनी टिळक यांना आधुनिक भारताचे निर्माते म्हटले. टिळक यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजंयतीची सुरुवात केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. यावेळी मोदींनी पुरस्काराची रक्कम नमामि गंगे प्रकल्पासाठी देण्याचे जाहीर केले आहे. वि. दा. सावरकर यांचे महत्त्व लोकमान्य टिळक यांनी ओळखले होते. अशा अनेक तरुणांना लोकमान्यांनी तयार केले.
- आज रस्त्याचे नाव बदलले तर हंगामा होतो, असा टोला मोदी यांनी काँग्रेसला लगावला. कर्तव्यपथाच्या नामकरणावरून मोदींनी ही टीका केली आहे.
- आत्मनिर्भर भारत योजनेला मोठे यश मिळत आहे. कोरोनाची लस बनविण्यात पुण्याचे मोठे योगदान आहे.
- विश्वास पूर्ण भरलेले लोक देशाच्या विकासासाठी काम करत आहेत.
- लोकमान्य टिळक भारताचे नेते आहेत. त्यांच्यासोबत गुजरातच्या लोकांचे सुद्धा संबंध राहिले. स्वातंत्र्याच्या काळात दीड महिना अहमदाबाद साबरमती जेलमध्ये होते. 1916 मध्ये टिळकचे अहमदाबादमध्ये आले. तेव्हा चाळीस हजारांपेक्षा जास्त लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी आले होते. त्यांना ऐकण्यासाठी प्रेक्षकांमध्ये सरदार वल्लभाई होते. यांच्या भाषणांनी सरदार वल्लभाई पटलांमध्ये उत्साह आला होता.
- भाषणाला सुरुवात करताना पंतप्रधान मोदींनी मराठीत सुरुवात केली आहे. देशाला अनेक महानायक देणाऱ्या भूमिला कोटी कोटी वंदन करतो. हे राज्य शिवाजी महाराज व चाफेकरांचे आहे. पुण्याचा पावन भूमीवर येण्याची संधी मिळाले. पुणे ही क्रांतिकारकांची पवित्र भूमी आहे, असे मोदी यांनी म्हटले.
- मी उत्साही तसेच भावूक आहे. आज अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. दोन्ही महापुरुंषाच्या चरणी नम्रपूर्वक वंदन करत आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दगडुशेठ गणपती मंदिरात पूजा सुरू आहे. यावेळी गणेशाचा मंत्रोच्चारात अभिषेकदेखील करण्यात येत आहे.
- महाविकास आघाडींच्या नेत्यांनी विरोध करूनही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आहेत. यावेळी शरद पवार यांनी शिवरायांनी स्थापन केलेले राज्य भोसले यांचे नव्हते, तर रयतेचे राज्य होते, असे म्हटले. देशात पुण्याला महत्त्व आहे, असे म्हटले. शिवरायांनी शाहिस्तेखानचा लाल महालात केलेला हल्ला हा देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता.
- मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यात पोहोचले आहेत. त्यांच्या राज्यपालांनी स्वागत केले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील स्वागतासाठी उपस्थित राहिले.
- पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सकाळपासूनच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठीक 10 वाजता पुण्यात आगमन होत आहे. त्यानंतर 10 वाजून 45 मिनिटांनी ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर इतर कार्यक्रमांना हजर राहणार आहेत.