पिंपरी-चिंचवड -पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जून रोजी देहूत ( PM Narendra Modi In Dehu ) दाखल होणार आहेत. शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम ( Sant Tukaram Maharaj Statue Launching ) यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक शहरभर लागताना दिसत आहेत. परंतु, मोशी येथील फलकावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेत विठ्ठला पेक्षा मोदींचा फोटो मोठा असल्याने हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. विठ्ठला पेक्षा कोणीही मोठं नाही असा उल्लेख करत हे भाजपाने जाणीवपूर्वक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
PM Narendra Modi Dehu Visit : विठ्ठलाच्या फोटो पेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो मोठा, राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जून रोजी देहूत ( PM Narendra Modi In Dehu ) दाखल होणार आहेत. शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम ( Sant Tukaram Maharaj Statue Launching ) यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामुळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फलक शहरभर लागताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदी देहूत -देहूत मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात भाजपकडून काही ठिकाणी पंतप्रधान यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. परंतु, फलकावर विठ्ठला पेक्षा मोदींचा फोटो मोठा असल्याने यावरून आता राजकारण रंगल आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेत हा वारकऱ्यांचा अपमान असल्याचं ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. भाजपाने जाणीवपूर्वक पांडुरंगापेक्षा मोदींचा फोटो मोठा दाखविला आहे, परंतु विठठला पेक्षा कोणीही मोठं नाही, अस रविकांत यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. त्यामुळं भाजपकडून काय प्रतिक्रिया येते अन यावरून किती राजकारण होत याकडे पाहावं लागणार आहे.