पिंपरी-चिंचवड - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14 जून ला देहूत दाखल होणार ( PM Modi Dehu Tour )आहेत. त्यांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिळा मंदिर आणि मुख्य मंदिर परिसराची पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस सहआयुक्त आनंद भोईटे, मंचक इप्पर यांनी पाहणी ( Director General of Police Inspected Dehu Temple ) केली. त्यांच्या सोबत पोलिसांचा मोठा फौज फाटा होता. पंतप्रधान यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही पाहणी केल्याचं सांगण्यात येत आहे.
येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे हा सोहळा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच, सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.