पुणे - पतंजलीच्या बिस्कीटमध्ये प्लास्टीक आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एका तरुणाने हे प्रकरण समोर आणले असून पतंजलीच्या हलगर्जीपणामुळे हे घडले असल्याचा आरोप त्याने केला आहे.
सावधान..! पतंजलीच्या बिस्किटात आढळले प्लास्टीक - पुणे
तुम्ही पतंजलीचे बिस्कीट खात असाल तर सावधान होण्याची गरज आहे. कारण या बिस्कीटमध्ये प्लास्टीक आढळून आले आहे.
![सावधान..! पतंजलीच्या बिस्किटात आढळले प्लास्टीक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3822159-thumbnail-3x2-pune.jpg)
पिंपरी-चिंचवडमधील रोहन वाघमारे या तरुणाने एका दुकानातून पतंजलीचे बिस्कीट पॉकेट खरेदी केले होते. त्याने त्यामधील ३-४ बिस्कीटे खाल्ली. मात्र, त्यानंतर बिस्किटात प्लास्टीकचा कागद दिसला. त्याने हा प्रकार दुसऱ्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर संबंधीत तरुणाने पतंजलीमधील बिस्कीटे त्याने ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यासमोर फोडले. त्यामध्ये चमकणारे प्लास्टीकचे लहान लहान तुकडे आढळून आले.
दरम्यान, हे बिस्कीट कुणी खाल्ले असते तर त्याला पोटाचा विकार झाला असता. आरोग्याबाबत जागृत राहायला सांगणारी पतंजली कंपनीच हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप त्या तरुणाने यावेळी केला.