महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दौंडच्या तरुणांनी उभारली व्हाट्सअपच्या माध्यमातून प्लाझ्मा दान चळवळ; हजाराहून अधिक रुग्णांची मदत - प्लाझ्मा दान चळवळ दौंड

कोरोनावर सर्वत्र प्लाझ्मा फायदेशीर ठरत असल्याने दौंडच्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्मा दान चळवळ उभारली असून त्या माध्यमातून आजवर सुमारे हजाराहून अधिक बाधित रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध झाला असल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत, अशी माहिती ग्रुपचे प्रमुख मयूर सोळसकर यांनी दिली.

दौंड
दौंड

By

Published : Apr 29, 2021, 8:33 PM IST

दौंड (पुणे) -कोरोनाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले असून उपचाराअभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. कोरोनावर सर्वत्र प्लाझ्मा फायदेशीर ठरत असल्याने दौंडच्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लाझ्मा दान चळवळ उभारली असून त्या माध्यमातून आजवर सुमारे हजाराहून अधिक बाधित रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध झाला असल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत, अशी माहिती ग्रुपचे प्रमुख मयूर सोळसकर यांनी दिली.

दौंडच्या तरुणांनी उभारली व्हाट्सअपच्या माध्यमातून प्लाझ्मा दान चळवळ

कोरानाच्या आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णाचे थोडे रक्त काढून त्याचे पृथक्करण केले जाते व त्यातून रक्तद्रव ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझ्मा’ हा एक विशिष्ट द्रव पदार्थ मिळवला जातो. या ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझ्मा’ मध्ये रुग्णाच्या अंगातील रोगप्रतिकारक द्रव्य (प्रतिद्रव्य) असते. ते कोरोनाची नव्याने लागण झालेल्यांवर उपचारासाठी उपय़ोगी पडते. एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असेल, तर त्याच्या शरिरात बऱ्या झालेल्या रुग्णाच्या अंगातील ‘कोन्व्हलेसेन्ट प्लाझ्मा’ टोचल्यास, त्या लागण झालेल्याच्या शरिरात तत्काळ रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

कोविड हेल्प सेंटर व्हाट्सअप ग्रुप -

कोविड हेल्प सेंटरचे २ व्हाट्सअप ग्रुप कार्यरत आहेत. सोशल मीडियावर ग्रुप तयार करून विविध भागातील समाजसेवकांना यामध्ये सामील करण्यात आले. यामध्ये काम करीत असताना एकमेकांची ओळख नसतानाही मदत करण्याचा प्रयत्न या ग्रुपवर प्रत्येकजण करतो. या ग्रुपचे काम सर्व व्हाट्सअप मेसेजवर चालते व्हाट्सअप ग्रुप रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत करत आहे.

कोरोना रुग्णांसाठी विविध कार्य -

यांच्या माध्यमातून रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच रुग्णांना खाट उपलब्ध करून देणे, रेमेडेसिवीर इंजेक्शन्स मिळवून देण्यास मदत करणे. गरीब व गरजू लोकांना मोफत रक्त मिळवून देणे, कोरोनासंबंधी इतर काही औषधे, रुग्णवाहिका लागल्यास उपलब्ध करून देणे. रुग्ण समुपदेशन करणे अशी कामे या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.

ग्रुपचे अ‌ॅक्टिव्ह स्वयंसेवक :

यामध्ये प्रामुख्याने भारतीय जैन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, मयुर सोळसकर, मिलिंद म्हेत्रे, निलेश कुंभार, सूरज चोरगे, शाम कापरे, धनराज मासाळ, अविनाश आखाडे, प्रकाश वरूडकर, महेश कड यांसह इतर स्वयंसेवक कार्यरत आहेत. सदर ग्रुपमध्ये तालुक्यातील व्यापारी, सेवाभावी संस्था, राजकीय नेते मंडळी, सरकारी व खासगी डॉक्टर, आरोग्य सेवक, फार्मासिस्ट, पोलीस, सर्व पत्रकार, प्रशासन, नोकरदार वर्ग व इतरही कार्यकर्ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून दौंड तालुक्यामध्ये व जिल्ह्यांमध्येही कोरोनाग्रस्तांना व नातेवाईकांना मदतीचा हात देत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आमदार राहुल कुल यांच्या कार्याने प्रेरीत होऊन गतवर्षी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सप्टेंबरमध्ये कोविड हेल्प सेंटर या व्हाट्सअप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. या ग्रुपमध्ये दौंड तालुका तसेच बाहेरील लोकांचा समावेश आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आजवर हजाराहून रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. २०० रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन, ५० रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ग्रुपच्या माध्यमातून अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर बेड मिळवून देण्यात सहकार्य करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details