महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन - अजित पवार बातमी

पुणे जिल्ह्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यात 2 लाख 30 हजार 937 हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी 26 हजार क्विंटल बियाणांची गरज आहे.

planning-of-kharif-season-for-2-dot-5-lakh-hectare-area-in-pune-district
planning-of-kharif-season-for-2-dot-5-lakh-hectare-area-in-pune-district

By

Published : May 1, 2020, 5:15 PM IST

पुणे - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध करुन देण्याबाबतचे आवश्यक ते नियोजन कृषी विभागाने करावे. कृषी निविष्ठाबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी भरारी पथके नेमून जादा दराने विक्री होणार नाही याबाबत दक्ष राहून खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन

हेही वाचा-तीन तारखेनंतर अधिक मोकळीक मिळणार, निर्बंध शिथिल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पण...

पुणे जिल्ह्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. पुणे जिल्ह्यात 2 लाख 30 हजार 937 हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, बाजरी, मका, नाचणी, सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी 26 हजार क्विंटल बियाणांची गरज आहे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते कृषीनिविष्ठा उपलब्ध करून देण्यासोबतच यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करू नका. कृषी निविष्ठाबाबत भरारी पथकाच्या माध्यमातून लक्ष ठेवणे आवश्यक असून यामध्ये जादा दराने विक्री होणार नाही तसेच याबाबत शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही या दृष्टीने सतर्क राहण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details