पुणे - कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला होणाऱ्या शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून विजयस्तंभ परिसराची पाहणी आणि नियोजन बैठक पार पाडली. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी नियोजनाबाबत स्थानिक प्रतिनिधींशी चर्चा करून नियोजनाचा आढावा घेतला.
कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक; जिल्हाधिकाऱ्यांचे शांततेचे आवाहन हेही वाचा -'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील'
शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि जर कोणी समाज माध्यमांद्वारे अफवा पसरवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले. कोरेगाव भीमा परिसरात कायदा व सुव्यवस्था बिघडवून अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.
हेही वाचा -यशोगाथा : दुष्काळावर मात करत जिरायती जमिनीवर पिकवली पेरुची बाग
मागील वर्षी शौर्यदिनाच्या कार्यक्रमात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, त्या या वर्षी सोडवण्याचा प्रयत्न करू, महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर सारखाच कोरेगाव भीमाचा येथील कार्यक्रम ही खूप मोठा होणार आहे. याठिकाणी येणाऱ्या अनुयायांसाठी वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सेवा प्रशासन पुरवणार आहे. सर्वांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी सर्वांच्या सहकार्यांची अपेक्षा असून सर्वांच्या सहकार्यानेच हे होईल, असे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.