पुणे- सकाळी मी बायकोशी बोलत होतो. तिला मी आज शाळेत कार्यक्रम असून माझा सत्कार होणार असल्याचे सांगितले. तसेच भाषण द्यावे लागणार असेही सांगितले. त्यावर ती म्हणाली, तू काय पण कर मराठीत मात्र नको बोलू. मग काय बायकोचे ऐकावच लागते. मग तो सर्जन असो की सर्जन जनरल, असे व्यक्तव्य नियोजित लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून सभागृहात एकच हशा पिकला.
देशाचे नियोजित लष्कर प्रमुख मनोज नरवणे रविवारी (दि. 22 डिसें) पुण्यातील एका कार्यक्रमात हजर होते. नरवणे हे ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्करप्रमुखपदी निवड झाल्याने ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने आज न्यु इंग्लिश स्कुल शाळेच्या मैदानावर त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सत्काराला उत्तर देताना नरवणे म्हणाले, ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आहे त्याच क्षेत्रात काम करा, हे आम्हाला शाळेने शिकविले. माझे आजचे यश हे प्रशालेने आमच्या जडणघडणीसाठी केलेल्या सांघिक प्रत्यत्नांचे यश आहे.