दौंड (पुणे) -एका व्यक्तीकडून एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पाटस गावातील उड्डाण पुलाच्या जवळील बसस्टॉप समोर करण्यात आली. लक्ष्मण उर्फ लखन दत्तात्रय सपकाळ (वय ३५, रा. कानगाव, वरसगाव वस्ती, ता. दौंड) असे आरोपीचे नाव आहे. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपीस यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
काय आहे घटना?
पाटस गावातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या शेजारील बसस्टॉपच्या समोर लक्ष्मण सपकाळ याच्याजवळ विनापरवाना व बेकायदेशीर रीतीने विकत घेतलेले एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळले. त्याच्याकडून हे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे तसेच मोटरसायकल असा एकूण 1 लाख 18 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याने हे पिस्तूल दिपक उर्फ मोगल्या पासलकर (रा. कुरण बु., ता.वेल्हा, जि. पुणे) या व्यक्तिकडून घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपीस यवत पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
हेही वाचा -सेलूत गावठी पिस्तूल, काडतूस अन् खंजीर जप्त; दोघांना अटक
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली.