बारामती- बारामती तालुका पोलिसांनी मेडद येथील गणेश काशीद यांच्याकडून गावठी पिस्तूलसह तीन जिवंत काडतूसे हस्तगत केली आहे. त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसांत भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील मेडद गावात गणेश काशीद याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या पथकाने त्याचावर पाळत ठेवली होती. गणेश काशीद हा मेडद येथील भैरवनाथ पेट्रोल पंपासमोर येणार असल्याची माहिती मिळाली होती.
बारामतीत गावठी पिस्तूल, काडतुसे जप्त; आरोपी अटकेत - ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख
बारामती तालुका पोलिसांनी मेडद येथील गणेश काशीद याच्याकडून गावठी पिस्तूलसह तीन जिवंत काडतूसे हस्तगत केली आहे.
बारामतीत गावठी पिस्तूलसह आरोपी अटकेत
त्यानुसार पोलिसांनी तेथे पाळत ठेवली. काशिद तेथे आल्यानंतर त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जावू लागला. दरम्यान पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुलसह तीन जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या आदेशाने करण्यात आली आहे.