गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचे पथसंचलन - जातीय दंगा काबू न्यूज
सध्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून, त्या पार्श्वभूमीवर पिंपरीमधील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करावा, असे आवाहन केले.
पिंपरी पोलिसांचे पथसंचलन
पिंपरी-चिंचवड(पुणे)- गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी पथसंचलन केले आहे. यावेळी पूर्व तयारी करत 'जातीय दंगा काबू' रंगीत तालीम देखील केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सांगितले आहे. यावर्षीचा गणेशोत्सव हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि शासनाने घालून दिलेल्या अटींनुसार पार पडणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी पोलिसांनी पथसंचलन केले आहे.
- पिंपरी हा मुख्य केंद्रबिंदू असल्याने परिसरात नेहमीच पोलिसांना अॅक्टिव्ह राहावे लागते. सध्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून, त्या पार्श्वभूमीवर पिंपरीमधील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करावा, असे आवाहन केले. तसेच नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी सांगितले आहे.