पुणे - पिंपरी-चिंचवडमधील तरुण ट्रेकिंगसाठी कर्जत येथील ढाक भैरव गडावर मित्रांसोबत गेलो होता. खाली उतरत असताना तब्बल 200 फूट खोल दरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रचिकेत भगवान काळे (वय-32, रा. पिंपरी-चिंचवड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रचिकेत हा आपल्या इतर चार मित्रांसोबत कर्जत तालुक्यातील ढाक भैरव गडावर ट्रेकिंगसाठी शनिवारी गेला होता. मात्र, त्यांना उशीर झाल्याने त्यांनी तिथेच मुक्काम केला आणि रविवारी सकाळी ते गडावरून खाली उतरत होते. तेव्हा, प्रचिकेतचा पाय निसटल्याने तो थेट दोनशे फूट खोल दरीत पडला. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
तरुणाचा 200 फूट खोल दरीत पडल्याने मृत्यू पायऱ्यांवरून खाली उतरून त्याचे मित्र आणि इतर ग्रुप त्याच्यापर्यंत पोहचले. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहचत दरीत उतरून मोठ्या शर्थीने मृतदेह वर आणला. घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात.. धावत्या कारचा फुटला टायर
अनिकेत बोकील, दीपक पवार, अनिल आंद्रे, शुभम आंद्रे, अविनाश केदारी, चंद्रकांत बोंबले, रसिक काळे, रोहीत वर्तक, ओंकार पडवळ, अशोक उंबरे, सतिष मेलगाडे, महेश मसने, गणेश गिद, विशाल मोरे, नेहा गिद, प्रियंका मोरे, नुतन पवार, ब्रिजेश ठाकूर ,अनिकेत आंबेकर, ओंकार म्हाळसकर, गोपाळ भंडारी, सुनील गायकवाड यांनी मृतदेह काढण्यास मदत केली.