पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी येथील रिक्षा थांब्यावर रिक्षाचा मीटर डाऊन करून या उपक्रमाची सुरुवात केली. पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षा थांब्यावर या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. यावेळी स्वतः कृष्ण प्रकाश यांनी रिक्षाने प्रवास करून मीटर ची सुरुवात केली. तसेच, रिक्षाचे ऑनलाइन पैसे देखील दिले.
पिंपरी-चिंचवडमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा सुरू मीटरने जाण्यास नकार दिल्यास होणार कारवाई-रिक्षाला मीटर बंधनकारक करण्यात आले आहेत. रिक्षा चालक काही पैशांसाठी मीटर नुसार जाण्यास नकार देतात, अशा वेळी नागरिकांनी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा. त्यानंतर संबंधित रिक्षा चालकावर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
रिक्षा मीटर प्रमाणे करण्याची नागरिकांची होती मागणी -पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शहरातील हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यात नागरिकांनी शहरातील रिक्षा मीटर प्रमाणे सुरू करण्याची मागणी केली. त्यानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे रिक्षा चालविण्यास नकार दिल्यास नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करावी. त्यानुसार पोलीस कठोर कारवाई करतील.
तर नागरिकांनी वाहतूक विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावावाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले म्हणाले, मीटर प्रमाणे रिक्षा सुरु करण्यासाठी रिक्षा संघटनांशी चर्चा केली. त्यात त्यांनी सकारात्मकता दाखवली. नागरिकांनी देखील रिक्षा भाडे मीटर प्रमाणे घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. जर रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे आकारले नाही, तर नागरिकांनी वाहतूक विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा. वाहतूक पोलिसांकडून याबाबत कारवाई केली जाईल.
पिंपरी-चिंचवडमध्ये मीटर रिक्षाचे दर-एक किलोमीटर - 18 रुपयेदोन किलोमीटर - 25 रुपयेतीन किलोमीटर - 37.70 रुपयेपाच किलोमीटर - 67 रुपये10 किलोमीटर - 123 रुपये