पिंपरी-चिंचवड - शहरात दिवसभरात ४५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नव्या रूग्णांसह शहरातील बाधितांची एकूण संख्या ६७८ वर पोहचली आहे. तर आज ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत तब्बल ४०१ शहरातील तर शहराबाहेरील ५५ रुग्णांना कोरोनामुक्त करून घरी सोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये आज ४५ कोरोनाबाधितांची नोंद, तर दोघांचा मृत्यू - pimpri chinchwad corona death
आहे. आतापर्यंत ६७८ जण बाधित झाले असून पैकी ४०१ शहरातील तर शहराबाहेरील ५५ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.
![पिंपरी-चिंचवडमध्ये आज ४५ कोरोनाबाधितांची नोंद, तर दोघांचा मृत्यू corona update pimpri chinchwad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-08:37-mh-pun-04-av-45-corona-mhc10002-05062020202430-0506f-1591368870-1032.jpg)
आज बाधित आढळले रुग्ण हे पिंपळे गुरव, दापोडी, वाकड, आनंदनगर, चिंचवड, कासारवाडी, पिंपरी, चऱ्होली, भोसरी, काळेवाडी, रुपीनगर, अजंठानगर, खेड येथील रहिवासी आहेत. तर आज किवळे, आनंदनगर, पिंपळेसौदागर, वाकड, बौध्दनगर, भोसरी, पिंपरी, निगडी, काळेवाडी फाटा, येरवडा, देहुरोड, सोलापूर, जुन्नर, खडकी, आंबेगांव येथील रहिवासी असलेल्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान दापोडी येथील ८० वर्षीय वृद्धावर तर राजगुरू नगर येथील ५८ वर्षीय व्यक्तीवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत ६७८ जण बाधित झाले असून पैकी ४०१ शहरातील तर शहराबाहेरील ५५ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. मात्र, बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सोशल डिस्टसिंग पाळणे महत्वाचे आहे.