पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी 'जनता कर्फ्यू'च्या पार्श्वभूमीवर एक अनोखा संदेश जनतेला दिला आहे. 'We stay here for you, Please stay home for us' ('आम्ही तुमच्या सेवेसाठी येथे हजर आहोत, तुम्ही कृपया आमच्यासाठी घरी थांबा'), असा संदेश फलकातून देण्यात आला आहे. हे फलक हातात घेऊन वाकड पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे.
देशामध्ये कोरोना बाधित रुग्णाची वाढती संख्या पाहून, त्यावर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले होते. त्यानुसार त्यांनी आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी असे, आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी 'जनता कर्फ्यू' हा नवा शब्द वापरला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन कोरोनाला रोखले पाहिजे, असे यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -'पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला जनतेने 100 टक्के प्रतिसाद द्यावा'