पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीला कोरोना झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी हे पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत, तर ते आपले कर्तव्य पुण्यात बजावतात. त्यामुळे कोरोनाचे लोण आता पोलिसांपर्यंत येऊन पोहचले असून त्यांनी स्वतः ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह - पुणे कोरोना अपडेट्स
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५१ वर पोहोचली आहे. यातील १३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून ते बरे झालेले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता ५१ वर पोहोचली आहे. यातील १३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून ते बरे झालेले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. खासगी लॅबमध्ये त्यांचे अहवाल पाठविण्यात आले होते. त्यामध्ये दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह दाम्पत्याला दोन मुली आहेत. दाम्पत्यासह मुलींना महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन्ही मुलींचे अहवाल हे पुण्यातील एनआयव्हीला पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन्ही मुलींना कोरोना आहे की, नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, शहरातील कोरोना बाधितांचा आकडा ५० वर पोहोचला आहे.