पिंपरी-चिंचवड - Whats App वर तरुणींचे फोटो पाठवून ऑनलाइन सेक्स रॅकेट (Online Sex Racket) चालवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (social security cell) ही कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. छत्तीसगड आणि दिल्ली येथील या तरुणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चिंचवड येथील कामिनी हॉटेलमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली आणि छत्तीसगड येथील तरुणींची सुटका -
चिंचवडच्या हॉटेल कामिनी येथे दिल्ली आणि छत्तीसगड येथील तरुणींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. जॅक नावाचा व्यक्ती समोरील व्यक्तीला तरुणींचे फोटो व्हॉट्सऍपवर पाठवून व्यक्तीला लॉज, हॉटेलमध्ये बोलवायचा. त्यानंतर तरुणीकडून जबरदस्ती वेश्या व्यवसाय करवून घेत होता.
सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई -
या प्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने बनावट ग्राहक पाठवून या व्हॉट्सऍपवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. कामिनी हॉटेलमधून तीन तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्या दिल्ली आणि छत्तीसगड येथील आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, डोंगरे आणि पोलीस उपनिरीक्षक धौर्यशील सोळंके यांच्या पथकाने केली आहे.