पिंपरी-चिंचवड शहरातून महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक, कर्नाटकच्या दोघांचा समावेश - pimpari chinchwad police latest news
सीसीटीव्हीच्या आधारे तळेगावमधून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. पैकी, दोघे हे मूळ कर्नाटक येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता पिंपरी-चिंचवड शहरातील महागड्या दुचाकी चोरून त्या कर्नाटक मधील देवदुर्गा (जि. रायचुर) या ठिकाणी लपवून ठेवल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, कर्नाटकमधील देवदुर्ग येथे जाऊन पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे यांच्या पथकाने सलग चार दिवस देवदुर्ग येथे थांबून 2 बुलेट, 3 एफझेड, 2 पल्सर, 1 पॅशन, अशा एकूण 8 महागड्या दुचाकी पोलिसांनी जप्त करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड : शहरातील महागड्या दुचाकी चोरून त्या कर्नाटक येथे विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेसात लाखांच्या 8 महागड्या दुचाकी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या सर्व दुचाकी कर्नाटकमधील देवदुर्ग गावी लपवून ठेवल्या होत्या. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणी अमरीश किसन चव्हाण (वय-19 रा. मोशी, मूळ कर्नाटक), किरण नूरसिंग राठोड (वय- 20 रा. वडगाव मूळ कर्नाटक) आणि करण अर्जुन कुऱ्हाडे (वय- 19 रा. वडगाव मावळ, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही कर्नाटकमधील आरोपी हे तळेगावमधील करण कुऱ्हाडे याच्या मदतीने शहरातील दुचाकी चोरत.
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरातून अज्ञात व्यक्तींनी दोन बुलेट चोरी केल्याचे समोर आले होते. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट एक तपास करत होते. सीसीटीव्हीच्या आधारे तळेगावमधून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. पैकी, दोघे हे मूळ कर्नाटक येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता पिंपरी-चिंचवड शहरातील महागड्या दुचाकी चोरून त्या कर्नाटक मधील देवदुर्गा (जि. रायचुर) या ठिकाणी लपवून ठेवल्या असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, कर्नाटकमधील देवदुर्ग येथे जाऊन पोलीस उपनिरीक्षक काळूराम लांडगे यांच्या पथकाने सलग चार दिवस देवदुर्ग येथे थांबून 2 बुलेट, 3 एफझेड, 2 पल्सर, 1 पॅशन, अशा एकूण 8 महागड्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदरणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रविंद्र राठोड, रविद्र गावडे, कर्मचारी बाळु कोकाटे, अमित गायकवाड, महादेव जावळे, सोमनाथ बोन्हाडे, सुनिल चौधरी, प्रमोद हिरळकार, सचिन मोरे, अंजनराव सोडगिर, प्रमोद गर्जे, आनंदा बनसोडे, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.