पुणे - देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्रीस आणणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ५ ने अटक केली आहे. आरोपींकडून १ लाख ५९ हजार रुपयांचे ३ पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सचिन महादेव जाधव असे बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विक्रीसाठी देशी बनावटीच्या ३ पिस्तुलांसह ६ जिवंत काडतुसे जप्त; आरोपी अटकेत - पिंपरी लेटेस्ट न्यूज
देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसे विक्रीस आणणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ५ ने अटक केली आहे. आरोपींकडून १ लाख ५९ हजार रुपयांचे ३ पिस्तुल आणि ६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
दरम्यान, आरोपी सचिन जाधवला पोलिसांनी सापळा रचल्याचा संशय आल्याने त्याने धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. परंतू, पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे काळे रंगाचे गावठी पिस्तुल मॅक्झीनसह मिळून आले. तर त्याच्या खिशामध्ये ६ जिवंत काडतूसे मिळून आली. त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये २ पांढऱ्या रंगाची देशी बनावटीचे पिस्तूल असे एकुण ३ देशी बनावटीचे पिस्तुल आणि ६ जिवंत काडतुसे मिळाली. पिस्तुल हे ओळखीच्या व्यक्तीकडून मध्यप्रदेश येथून विक्रीसाठी आणले होते अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे.