पिंपरी-चिंचवड (पुणे)- खुनी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेसह चौघांना पोलिसांनी रत्नागिरीतून अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी माहिती दिली आहे.
सिद्धार्थ बनसोडे, आमदारांचे स्वीय सहायक (पीए) सावंतकुमार सलादुल्ला, सतिश लांडगे, रोहित पंधरी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील हेडगेवार भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे याने कामगारांना तानाजी पवार कुठे आहे, असे म्हणत बेदम मारहाण केली होती. या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला होता. त्या प्रकरणानंतर आमदारांवर गोळीबार केल्याचा आरोप असलेला तानाजी पवारने पिंपरी पोलिसात खुनी हल्ला केल्याची तक्रार देत 21 जनांनी नावे नोंदवली. त्यानुसार, सिद्धार्थवर खुनी हल्ल्याचे दोन गुन्हे दाखल होते. त्यानंतर, सिद्धार्थ इतर साथीदारांच्या मदतीने फरार झाला होता. त्यांना निगडी पोलिसांनी रत्नागिरी येथून सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायलाने सुनावली आहे.
हेही वाचा -एकतर्फी प्रेमातून गोळीबार, आरोपी अटकेत