पुणे - पिंपरी-चिंचवडच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. सागर साहेबराव शेवते (वय-३०, रा. घरकुल वसाहत चिखली) असे ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेराचे नाव आहे. त्याला भोसरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर मारामारी आणि विनापरवाना पिस्तुल बाळगळ्याल्याप्रकरणी भोसरी आणि निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसांसह एकाला अटक - pistol
सराईत गुन्हेगार सागर हा भोसरी परिसरातील मुंजाबा मित्र मंडळ येथील असून त्याच्याकडे गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सापळा रचून सागरला ताब्यात घेतले.
सराईत गुन्हेगार सागर हा भोसरी परिसरातील मुंजाबा मित्र मंडळ येथी असून त्याच्याकडे गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बढे यांच्या टीमने सराईत गुन्हेगार सागर हा गणपती मंदिरासमोर बसलेला असल्याची खात्री केली. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सापळा रचून सराईत गुन्हेगार सागरला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी पिस्तुल आणि मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळाली. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात विनापरवाना पिस्तुल बाळगल्याप्रकरणी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारामारी आणि पिस्तुल बाळगळ्याप्रकरणी या अगोदरदेखील गुन्हे दाखल आहेत.