पिंपरी-चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस उत्पादक कंपनीकडून ग्लोबल टेंडर पध्दतीने लस थेट खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे यांनी दिली. लस खरेदी संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांना पत्रानूसार सूचना करण्यात आल्याचेही महापौर यांनी सांगितले.
शासनाकडून लस कमी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका करणार थेट कंपनीकडून लस खरेदी - महापौर ढोरे - पिंपरी चिंचवड कोरोना लेटेस्ट न्यूज
शासनाकडून शहरासाठी जो लसींचा साठा उपलब्ध होतो, त्यातही शहराबाहेरील नागरिक नोंदणी करून त्याचा फायदा घेतात. त्यामुळे लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसल्याने शहरातील नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागते.
सद्यस्थितीमध्ये शहरासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस शासनाकडून अत्यंत अपुऱ्या प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यास बराच कालावधी लागू शकतो. शासनाने अगोदरच लसीकरणाबाबत नियमावली जाहीर केली आहे. तसेच, शहरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यानूसार लसदेखील त्याच प्रमाणात आवश्यक आहे. शासनाकडून शहरासाठी जो लसींचा साठा उपलब्ध होतो, त्यातही शहराबाहेरील नागरिक नोंदणी करून त्याचा फायदा घेतात. त्यामुळे लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात नसल्याने शहरातील नागरिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागते.
कंपन्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस थेट खरेदी करणार
संभाव्य कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना वाचविण्यासाठी महापालिकेच्या निधीतून उत्पादित कंपन्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस ग्लोबल टेंडर पध्दतीने थेट खरेदी करणार आहे, त्यासाठी शहरात वाढणारा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांना त्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी महापालिकेच्या निधीतून लस उत्पादित कंपन्यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस थेट खरेदी करण्यासंदर्भात स्थायी समितीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी तात्काळ ग्लोबल टेंडर प्रक्रिया राबवून लस खरेदी करण्यात येणार आहे, असेही महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.