महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pimpri Chinchwad Gang Rape : 19 वर्षीय तरुणीवर मित्राचा बलात्कार, नंतर ब्लॅकमेल करून तिघांचा सामूहिक अत्याचार - 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पिंपरी-चिंचवडमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीला घरी बोलावून आरोपीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले अन् त्याचे फोटो काढून पुन्हा धमकावत तिच्यावर इतर दोन मित्राच्या सोबतीने सामूहिक बलात्कार केला आहे.

Pimpri Chinchwad Gang Rape
Pimpri Chinchwad Gang Rape

By

Published : Dec 22, 2021, 7:17 PM IST

पुणे -पिंपरी-चिंचवडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोघांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित तरुणीला घरी बोलावून आरोपीने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले अन् त्याचे फोटो काढून पुन्हा धमकावत तिच्यावर इतर दोन मित्राच्या सोबतीने सामूहिक बलात्कार केला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी प्रथमेश उर्फ सनी खैरे, स्वराज कदम आणि प्रथमेशच्या एका मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवर मित्राने इतर दोन मित्रांसह सामूहिक बलात्कार केला आहे. 15 डिसेंबरला ही घटना पिंपळे गुरवच्या देवकर पार्क परिसरात घडली आहे. या प्रकरणात सांगवी पोलिसांनी प्रथमेश उर्फ सनी खैरे, स्वराज कदम आणि प्रथमेशच्या एका मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश उर्फ सनी खैरे याने पीडित मुलीला आपल्या फ्लॅटवर बोलावले. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध स्थापित करून तिची नग्न छायाचित्रे काढली.

त्यांनतर पीडित मुलगी आपल्या घराकडे परत जात असताना तिला तिचे नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत परत आपल्या फ्लॅटवर बोलवले. त्यानंतर सनीच्या दोन मित्रांनी देखील पीडित मुलीवर बळजबरीने बलात्कार केला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहून सांगवी पोलिसांनी लगेच दोन आरोपींना अटक केली आहे. तिसऱ्या एका आरोपीचा शोध सांगवी पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details