पुणे -पुण्याच्या औंध परिसरात प्राचार्य असलेल्या व्यक्तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या एका व्यक्तीने राहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गजानन वैजनाथ परीथवाड (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली.
हेही वाचा -मांढरदेव येथे युवकाचा मृतदेह आढळला; घातपाताची शक्यता
गजानन परीथवाड हे औंध मधील नागरस रस्त्यावरील हर्ष पॅराडाईज या सोसायटीमध्ये पत्नीसह राहत होते. त्यांना दोन मुले असून दोन्ही मुले परदेशात राहतात. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने ही घटना पाहिली. त्याने याबाबत सोसायटीतील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर सोसायटीच्या इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, सोसायटीतील रहिवासी असणाऱ्या एका डॉक्टरांनी त्यांना तपासले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
हेही वाचा -कडाक्याच्या थंडीत फोनवर बोलणे पडले महागात, तरुणाचा मृत्यू