महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाला सुरुवात; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली लस - पिंपरी चिंचवड पुणे कोरोना लसीकरण

यावेळी महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पवन साळवी यांनी प्रथम लस टोचवून घेतली आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड

By

Published : Jan 16, 2021, 6:51 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) - अवघ्या जगात थैमान घालणाऱ्या कोरोनावर आजपासून भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील महानगर पालिकेच्या रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली असून प्रथम नागरिक महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड

यावेळी महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पवन साळवी यांनी प्रथम लस टोचवून घेतली आहे. लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

शहरातील आठ केंद्रांवर दिली जात आहे कोविड लस

पिंपरी-चिंचवड शहरातील आठ महानगर पालिकेच्या रुग्णालयात कोविड लसीचे केंद्र असून आज आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. आठ केंद्रांवर प्रत्येकी शंभर जणांना ही लस टोचवण्यात येणार आहे. महानगर पालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरण केंद्राचे उदघाटन महापौर यांच्या हस्ते करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.

पिंपरी-चिंचवडला 15 हजार कोरोना लसीचे डोस

पिंपरी-चिंचवड शहराला 15 हजार लस (डोस) देण्यात आले असून 17 हजार आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे. आजपासून सुरू करण्यात आलेल्या लसीकरणानंतर लस आरोग्यास हानिकारक नसल्याचे आणि आरोग्य अधिकारी पवन साळवी यांनी सांगितले आहे. पहिल्यांदा त्यांनी लस टोचवून घेत लसीकरणाला सुरुवात करून दिली. त्यानंतर त्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले होते.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात या नागरिकांना मिळणार लस

लसीचा कोणताही दुष्परिणाम झाला नसल्याचं सांगत नागरिकांनी घाबरून जाये नये असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन ओरिअर आणि तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. हे लसीकरण आणखी वेगात केले तर काही महिन्यांमध्ये आपला भारत देश कोविड मुक्त होईल यात काही शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details