महाराष्ट्र

maharashtra

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 195; एकाचा मृत्यू

By

Published : May 17, 2020, 8:59 AM IST

Updated : May 17, 2020, 10:42 AM IST

पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांची संख्या १९५ वर पोहोचली आहे. औंध उरो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील ११९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

pimpri chinchwad corona
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 195

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १९५ पोहोचली आहे. शहरातील ११९ जण कोरोनामुक्त झालेले असून पैकी दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट

औंध उरो जिल्हा रुग्णालयात ५८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ती व्यक्ती पुण्यात वास्तव्यास होती. चार दिवसांपासून त्या व्यक्तीवर औंध उरो जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औंध जिल्हा रुग्णालयात एकूण १० जण कोरोनाबाधित असून पैकी सहा जणांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती तेथील प्रशासनाने दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील हे परिसर सील होणार

  1. साई पॅराडाईज, पिंपळे सौदागर (साई साहेब सोसायटी शेजारी-अंतर्गत रस्ता-अंतर्गत रस्ता-न्यु पूना बेकरी–शिव साई लेन रोड-साई साहेब सोसायटी शेजारी)
  2. पंचदुर्गा सहकारी गृहनिर्माण संस्था, रुपीनगर (सिध्दीविनायक गणपती मंदिर–मिनारा मशिद–मावली मेडिकल–हमराज टेलर्स–रुपीनगर पोस्ट ऑफिस–रुपीनगर रोड–सिध्दीविनायक गणपती मंदिर)

हे परिसर शनिवारी रात्री पासून पुढील आदेश मिळेपर्यंत सील करण्यात येणार आहेत. सदर परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना मनाई केलेली आहे.

Last Updated : May 17, 2020, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details