पिंपरी-चिंचवड (पुणे) - पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी लसीकरण केंद्रात जाऊन कोविड लस घेतली. या वेळी, कृष्ण प्रकाश यांनी प्रशासनाचे आभार मानले असून प्रत्येकाने कोविड लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी ही कोविड लस घेतली.
पिंपरी-चिंचवड : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली कोविड लस - पिंपरी-चिंचवड पोलीस कर्मचाऱ्यांना कोविड लस न्यूज
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना कोविड लस देण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात 'फ्रंट लाईन वॉरिअर' म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. हे लसीकरण आणखी वेगात केले तर, काही महिन्यांमध्ये देश कोविडमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार करेल.
हेही वाचा -''व्हॅलेंटाईन डे'ची भेट म्हणून 'ते' सात नगरसेवक पाठवले, उद्धव ठाकरेंनी त्यांचा स्वीकार करावा'
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी यांना देण्यात आली लस
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना कोविड लस देण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात 'फ्रंट लाईन वॉरिअर' म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. हे लसीकरण आणखी वेगात केले तर, काही महिन्यांमध्ये देश कोविडमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा पार करेल.
शहरातील आठ केंद्रावर लस देण्यात आली होती
पिंपरी-चिंचवड शहरातील आठ महानगर पालिकेच्या रुग्णालयात कोविड लसीचे केंद्र असून आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात आली. आठ केंद्रांवर प्रत्येकी शंभर जणांना ही लस टोचण्यात आली असून महानगर पालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात लसीकरण केंद्राचे उदघाटन नुकतेच महापौरांच्या हस्ते करण्यात आले होते.
हेही वाचा -'बर्ड फ्ल्यू' जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर; 12 लाख पक्ष्यांचे पोल्ट्री फार्म निगराणीखाली