महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 7, 2021, 3:51 PM IST

ETV Bharat / state

मोदी सरकारला सत्तेची मस्ती, त्यामुळे सामान्यांचा आवाज ऐकू येत नाही - शहराध्यक्ष सचिन साठे

वाढत्या महागाई विरोधात पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी पेट्रोल महागले असून त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत असल्याचे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.

Congress Sachin Sathe oppose diesel price hike
डिझेल दरवाढ काँग्रेस विरोध पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड (पुणे)- वाढत्या महागाई विरोधात पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. यावेळी पेट्रोल महागले असून त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत असल्याचे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले.

महागाई विरोधात आंदोलन करताना काँग्रेस कार्यकर्ते

हेही वाचा -चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील अट्टल आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद

मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे, त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाचे दर कमी होत असताना केंद्र सरकार मात्र पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढवत आहे. महाराष्ट्रात तर पेट्रोल शंभर रुपये लिटर पेक्षा जास्त महाग झाले आहे. त्याचा परिणाम महागाई वाढण्यात होत आहे. याची झळ सामान्य जनतेला बसत आहे. या भाववाढीवर नियंत्रण मिळवले नाही, तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी दिला.

यावेळी साठे म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्याऐवजी भाववाढ करून त्रास देऊन कात्रीत पकडण्याचा प्रकार केला आहे, असे साठे म्हणाले. इंधन व भाववाढीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानंतर शहरात विविध ठिकाणी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलख येथील भारत पेट्रोलियमच्या पंपासमोर, भोसरी येथे संभाजीनगर येथील पंपासमोर भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली, पिंपरी ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली दापोडी, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली डांगे चौकात निदर्शने करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, महाप्रदेश कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती शाम आगरवाल, तसेच शहाबुद्दीन शेख, मयुर जयस्वाल, सुनिल राऊत, अक्षय शहरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा -VIDEO : जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा उगम चीनमधूनच.. पुण्यातील संशोधकांची जागतिक पातळीवर दखल

ABOUT THE AUTHOR

...view details