पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड परिसरात 2003 रोजी सराफी पेढीवर अज्ञात पाच जणांच्या टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला होता. यात 21 तोळे सोन्याचे दागिने आणि 8 लाख 50 हजार रोख रक्कम घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला होता. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अज्ञात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पैकी, एक जण फरार होता त्याला गुन्हे शाखा युनिट 5 ने अटक केली आहे.
रघुविरसिंग चंदुसिंग टाक (51) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव असून त्याला परतूर जि. जालना येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात 20 पेक्षा अधिक गुन्हे या आरोपीवर दाखल आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा -घरात वडिलांचा मृतदेह असतानाही 'त्याने' दिला पेपर, आज निकाल पाहून आले डोळ्यात पाणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2003 रोजी पहाटे सव्वातीन सुमारास देहूरोड येथील सराफी पेढीवर अज्ञात 5 जणांनी दरोडा टाकला. ज्वेलरी दुकान धनराज केसरी मल यांच्या मालकीचे होते. दरम्यान, त्यांच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून धाक दाखवत 21 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम साडेआठ लाख रुपये घेऊन पाचही आरोपी फरार झाले होते. यापैकी आरोपी रघुवीर हा फरार होता. त्याला 17 वर्षानंतर अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. संबंधित आरोपीला मोठ्या शिताफीने जालना जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. योगायोग म्हणजे 29 जुलै 2003 ला हा दरोडा टाकण्यात आला होता. यातील आरोपी रघुवीरसिंग ला 29 जुलै 2020 म्हणजे 17 वर्षानंतर अटक करण्यात आली आहे.
सदर ची कामगिरी सदरची वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, भरत माने, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, सावन राठोड, संदिप ठाकरे, मयुर वाडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, स्वामीनाथ जाधव, नितिन बहिरट, श्यामसुदंर गुट्टे, गणेश मालुसरे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे, यांनी केली आहे.