पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने 199 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी 12 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आज मृत झालेले रुग्ण खंडोबा माळ भोसरी, (पुरुष, वय-५१ वर्षें) व लातूर (पुरुष वय- ३६वर्षे) येथील रहिवासी आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 909 वर पोहचली आहे. तर 77 जण कोरोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत 1 हजार 886 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात 199 कोरोनाबाधित आढळले; दोघांचा मृत्यू - Patients in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने 199 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी 12 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 909 वर पोहचली आहे.
आज सर्वाधिक 199 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे आनंदभुवन सोसायटी थेरगाव, त्रिवेणीनगर तळवडे, पवारवस्ती दापोडी, दळवीनगर निगडी, गव्हाणेवस्ती भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, मोहननगर चिंचवड, संभाजीनगर, विवेकनगर आकुर्डी, काळभोरनगर चिंचवड, विठ्ठल मंदीर आकुर्डी, कलाटेनगर वाकड, शेंडगेवस्ती वाकड, गुलिस्तानगर कासारवाडी, गुरुदेवनगर आकुर्डी, दत्तवाडी आकुर्डी, गणेशनगर बोपखेल, घरकुल चिखली, तापकीरनगर काळेवाडी, गायकवाडवस्ती मोशी, चिंचवड स्टेशन, बापुकाटे चाळ दापोडी, वाकडकरवस्ती वाकड, केमसेवस्ती वाकड, बौध्दनगर पिंपरी, नवनाथ मंदीर बोपखेल, सदगुरुनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, इंदिरानगर चिंचवड, भाऊ पाटील रोड दापोडी, अल्हाटवस्ती वाकड, साईप्रितमनगर रहाटणी, रिव्हररोड पिंपरी, मिलंदनगर पिंपरी, आदर्शनगर पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, सुभाषनगर पिंपरी, कोकणेनगर काळेवाडी, साईबाबानगर चिंचवड, राजेवाडेनगर काळेवाडी, कृष्णा ट्रेडर्स काळेवाडी, आळंदीरोड भोसरी, दळवीचाळ काळेवाडी, समृध्दी हॉटेल पिंपरी, तथागत हौसिंग सोसयटी पिंपरी, वाघेरे चाळ पिंपरी, पिंपरीगाव, शिवशक्ती हौसिंग सोसायटी निगडी, चिंचवडेनगर, गुरुदेवनगर आकुर्डी, फुलेचौक रहाटणी, दिघीरोड भोसरी, गणेशनगर थेरगाव, सुदर्शननगर चिखली, लक्ष्मीनगर रावेत, म्हातोबा मंदीर रोड वाकड, राजीव गांधी वसाहत नेहरुनगर, आळंदीरोड चिखली, केसर ट्री टाऊन मोशी, तानाजीनगर चिंचवड, सेक्टर २५ प्राधिकरण, नखातेनगर थेरगाव, लांडगेआळी भोसरी, खडकीरोड बोपोडी, अमरावती, सासवड, चाकण, देहुरोड, बीड, मुंबई, सुपे व खडकीबाजार येथील रहिवासी आहेत.