महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरांचा हवेत गोळीबार! - Mayor Rahul Jadhav opened fire in the air

महापौर राहुल जाधव यांनी पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाची सपत्नीक जलपूजा केली. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित होते. महापौरांनी आपली नवी परवानाधारक पिस्तूल काढली. ते पिस्तूल पाहिल्यानंतर त्यातून गोळी झाडावी, असे नेते आणि कार्यकर्त्यांनी महापौरांना आग्रह केला. तेव्हा त्यांच्या आग्रहाखातर महापौर यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या.

महापौर राहुल जाधव

By

Published : Aug 8, 2019, 7:41 AM IST

पुणे- पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी आपल्या नव्या पिस्तुलातून हवेत दोन गोळ्या झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. मात्र, असे काही झालेच नसल्याचे महापौरांनी सांगून, त्यांच्याकडून घडलेल्या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या परिसरात महापौर राहुल जाधव यांनी हवेत गोळीबार केला होता

महापौर राहुल जाधव यांनी पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाची सपत्नीक जलपूजा केली. यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले आदी उपस्थित होते. सर्व विधी झाल्यानंतर महापौर जाधव इतर नेत्यांसह एका हॉटेलमध्ये गेले व तेथे सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर हॉटेल बाहेर येऊन सर्व जण गप्पा मारत असताना महापौरांनी आपली नवी परवानाधारक पिस्तूल काढली. ते पिस्तूल पाहिल्यानंतर त्यातून गोळी झाडावी, असे नेते आणि कार्यकर्त्यांनी महापौरांना आग्रह केला. तेव्हा त्यांच्या आग्रहाखातर महापौरांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या. मात्र, याप्रकरणी आता महापौर जाधव काहीच बोलायला तयार नाहीत. असे काही केलेच नसल्याचा महापौरांकडून कांगावा केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details