महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाकण आणि वाकडमधून 13 लाख 29 हजारांचा गुटखा जप्त; सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

आरोपी दलपत भाटी याने त्याच्या भाड्याच्या खोलीत गुटख्याची साठवणूक केली. दुसरी कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण परिसरातील खालूंब्रे येथे दुपारी सव्वातीन वाजता चाकण-तळेगाव रोडवर येथे केली.

जप्त केलेला गुटखा
जप्त केलेला गुटखा

By

Published : Dec 23, 2020, 8:05 PM IST

Updated : Dec 23, 2020, 8:46 PM IST

पुणे-पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने कारवायांचा धडाका सुरूच ठेवला आहे. या पथकाने चाकण आणि वाकड परिसरात दोन ठिकाणी कारवाया करून 13 लाख 29 हजार 251 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने एकूण 36 लाख 79 हजार 916 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुटख्याची साठवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी चा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दलपत पत्ताराम भाटी (वय- 27 रा.थेरगाव), रामाराम करनाराम जाट (वय- 24 रा. खालूंब्रे, ता. खेड), दिनेश भवरलाल भाटी (वय-24) मांगीलाल लख्खाराम चौधरी (वय-22, रा. सुदर्शननगर, चिंचवड) आणि ओमप्रकाश वीरमाराम विष्णोई (रा. खालूंब्रे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई



पहिली कारवाई वाकड परिसरात

आरोपी दलपत भाटी याने त्याच्या भाड्याच्या खोलीत गुटख्याची साठवणूक केली. त्या गुटख्याची स्कोडामधून वाहतूक करून विक्री करणार असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा लावून दुपारी पावणे चार वाजता कारवाई केली आहे.

हेही वाचा-सरपंच पद सोडत रद्द विरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका..

15 लाखांचा मुद्देमाल जप्त-पोलिसांनी कारवाईमध्ये 8 हजार 450 रुपये रोख रक्कम, 7 लाख 52 हजार 242 रुपये किमतीचा गुटखा, 7 लाख 20 हजारांची स्कोडा कार, 35 हजारांचा अ‌ॅपल कंपनीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. हा एकूण 15 लाख 15 हजार 692 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-हुतात्मा गणेश गावंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दुसरी कारवाई चाकण परिसरात

दुसरी कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण परिसरातील खालूंब्रे येथे दुपारी सव्वातीन वाजता चाकण-तळेगाव रोडवर येथे केली. यात रामाराम करनाराम जाट, दिनेश भवरलाल भाटी, मांगीलाल लख्खाराम चौधरी, ओमप्रकाश वीरमाराम विष्णोई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी बालाजी ट्रेडिंग कंपनी या दुकानात प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवला होता. त्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.

21 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी पाच लाख 77 हजार 9 रुपये किमतीचा गुटखा, तंबाखू, सिगारेट, 72 हजार 215 रुपये रोख रक्कम, 16 लाख 50 हजार रुपये किमतीची तीन वाहने, 65 हजारांचे तीन मोबाईल फोन जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 21 लाख 64 हजार 224 रुपयांचा आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या पथकाने केली आहे.

Last Updated : Dec 23, 2020, 8:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details