पिंपरी-चिंचवड (पुणे) - महाराष्ट्र राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात आज सशर्त केसकर्तनालय खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक दुकाने दुकान मालकांनी उघडली आहेत. परंतु, आज रविवार असून देखील ग्राहक नसल्याचे दुकान मालक चिंतेत आहेत.
सलूनमध्ये ग्राहक नसल्याने चालक-मालक चिंतेत; 'दाढी करण्यासाठी परवानगी द्या' - पिंपरी-चिंचवड सलून बातमी
कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यात, हेअर कट करण्यास आलेला प्रत्येक ग्राहक दाढी करण्यास सांगत आहे. त्यामुळे केसकर्तनालाय चालक, मालक हे राज्य सरकारने लवकरात-लवकर दाढी करु देण्यासंदर्भातील निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी करत आहे.
![सलूनमध्ये ग्राहक नसल्याने चालक-मालक चिंतेत; 'दाढी करण्यासाठी परवानगी द्या' pimpari chinchwad saloon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7809913-733-7809913-1593357554747.jpg)
सलूनमध्ये ग्राहक नसल्याने चालक-मालक चिंतेत
सलूनमध्ये ग्राहक नसल्याने चालक-मालक चिंतेत; 'दाढी करण्यासाठी परवानगी द्या'
कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यात, हेअर कट करण्यास आलेला प्रत्येक ग्राहक दाढी करण्यास सांगत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात-लवकर दाढी करु देण्यासंदर्भातील निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी केशकर्तनालय चालक, मालक करत आहे. या विषयी आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सलून मालक विशाल अहिरे यांच्याशी साधलेला संवाद.
Last Updated : Jun 28, 2020, 9:12 PM IST