पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात पहाटेच्या सुमारास प्रभात फेरीसाठी बाहेर आलेल्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. यात माजी महापौरांचा समावेश असून त्यांनादेखील निगडी पोलिसांनी अनोखी शिक्षा दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सर्व जणांना शपथ देण्यात आली. तर दुसरीकडे व्यायामासाठी आलेल्या तरुणांना कोंबडा बनण्याची शिक्षा पोलिसांनी दिली होती.
VIDEO : प्रभात फेरीसाठी बाहेर पडलेल्या माजी महापौरांसह इतरांचा पोलिसांकडून पाणउतारा
शहरात सध्या ५१ कोरोना बाधित रुग्ण असून पैकी १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून निगडी प्राधिकारण परिसरात पोलिसांनी आवाहन करून देखील अनेक नागरिक प्रभात फेरीसाठी बाहेर पडत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून बाधितांचा आकडा ५०च्या पुढे गेला आहे. शहरात सध्या ५१ कोरोनाबाधित रुग्ण असून पैकी १३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून निगडी प्राधिकारण परिसरात पोलिसांनी आवाहन करूनदेखील अनेक नागरिक प्रभात फेरीसाठी बाहेर पडत आहेत.
शुक्रवारी प्रभात फेरीसाठी आलेल्या नागरिकांच्या हाती 'मी गाढव आहे' अशा आशयाचे फलक दिले होते. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करत सोडून दिले. आजही अनेक नागरिक व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. तेव्हा आकुर्डी पोलिसांनी त्यांना थांबवत चांगला पाणउतारा करत विविध कवायती करायला लावल्या. यात माजी महापौरांचा समावेश होता. त्यानंतर संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करून सोडून देण्यात आले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.