पुणे - लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या दिव्यांग नागरिकांच्या मदतीसाठी पुण्यातील 'दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स' संस्था धावून आली. कोरोनामुळे अनेकांनी रोजगार गमावला. त्यामुळे या संस्थेच्या मदतीने दिव्यांग नागरिकांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून हे मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे. तयार झालेले मास्क पुण्याजवळील कंपन्यांमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. यामधून मिळालेल्या पैशातून दिव्यांग नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
लॉकडाऊनमुळे रोजगार तर गेला, पण दिव्यांग नागरिकांनी 'असा' शोधला पर्याय - लॉकडाऊनचा दिव्यांग नागरिकांचा परिणाम
दिव्यांग नागरिक आता दररोज अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्रात मास्कची निर्मिती करतात. त्यांनी तयार केलेले हे मास्क पुण्याजवळील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विक्री केले जातात. त्यासाठी अनेक कंपन्यांसोबत करार देखील केले आहेत. एखाद्या कंपनीच्या आवश्यकतेनुसार हे मास्क तयार केले जातात आणि संबंधितांकडे पाठवले जातात. या उपक्रमामुळे दिव्यांगाच्या हाताला रोजगार मिळाला आणि लॉकडॉऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून त्यांची सुटका झाली.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योगधंदे बंद पडले, तर अनेकांवर आर्थिक संकटही कोसळले. पुण्यातील दिव्यांग बांधवही लॉकडाऊनच्या कचाट्यातून सुटू शकले नाहीत. त्यांचे छोटे मोठे उद्योग व्यवसाय या काळात बंद पडले. हातावर पोट असल्यामुळे शेवटी जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दिव्यांग नागरिकांची ही अवस्था पाहून पुण्यातील 'दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स' या संस्थेने पुढाकार घेतला. संस्थेने मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि शिलाई मशीन वानवडी परिसरात असलेल्या अपंग कल्याणकारी शिक्षण संस्थेला दिली. तिथेच त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मास्क निर्मितीचे काम सुरू झाले.