महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; आरोपीला अटक - baramati crime news

बारामतीत शिक्षणानिमित्त राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

crime news
बारामतीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

By

Published : Jan 23, 2020, 9:21 AM IST

पुणे- बारामतीत शिक्षणानिमित्त राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विशाल सुनील महाजन (वय २०, रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याच्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.

हेही वाचा -शरद पावर हे राजकारणातील चंद्रगुप्त - नाना पाटेकर

मूळच्या इंदापूरच्या असलेल्या महिलेने याबाबत तक्रार दाखल केली. १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत भीगवण व बारामतीतील एका लॉजवर हा प्रकार घडला. तक्रारीत अल्पवयीन मुलीला भूलथापा देत, प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचे म्हटले आहे. १५ जानेवारीला तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवत जेजुरी येथे नेले. तेथे तिच्या डोक्यात कुंकू भरत सोबत फोटो काढले ते व्हॉटसअ‌ॅप स्टेटसवर टाकत तिच्याकडे वारंवार शरीरसंबंधाची मागणी करत तक्रारदाराच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. दरम्यान, आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details