महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संतापजनक! पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून खून - पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर मध्यरात्री घरामागे लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ६ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून खून

By

Published : Jul 23, 2019, 9:53 PM IST

Updated : Jul 23, 2019, 10:10 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या चिमुकलीचे मध्यरात्री अपहरण करून घरामागे लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ६ जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये अडीच वर्षीय चिमुकलीचा गळा आवळून खून

पीडित मृत अडीच वर्षीय चिमुकलीचे रात्री दीडच्या सुमारास अज्ञात नराधमाने राहत्या पत्र्याच्या शेडमधून अपहरण केले. रात्री उशिरा मृत मुलीच्या आईला जाग आल्याने ती बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर आई-वडिलांनी काही तास तिचा शोध घेतला. मात्र, तिचा शोध लागत नसल्याने अखेर त्यांनी सांगवी पोलीस ठाणे गाठले.

त्यानंतर सांगवी पोलिसांच्या १५ जणांच्या पथकाने पीडित चिमुकलीचा शोध सुरू केला. सर्व परिसर पिंजून काढण्यात आला. त्याचवेळी पीडित मुलीच्या घराच्या पाठीमागे काही अंतरावर मिलिटरी सीमाभिंतीच्या आत या चिमुकलीचा मृतदेह नाल्यातील पाण्यात तरंगत असल्याचे दिसले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पीडित मुलीचा मृतदेह औंध येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर तातडीने शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले हे अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Jul 23, 2019, 10:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details