पुणे -नराधम बापाने १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. याबाबत पत्नीच्या तक्रारीनंतर बापावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाप-लेकीच्या नात्याला काळीमा, पुण्यात सावत्र बापाचाच १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार - आळंदी
नराधम सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
हे कुटुंब मुळचे मध्यप्रदेशचे असून ते पुण्यात रोजगारासाठी आले होते. ज्या मुलीवर बलात्कार झाला आहे. तिच्या आईचा हा दुसरा विवाह आहे. तो तिचा सावत्र बाप असून नराधमाने मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी नराधम बापाविरोधात पत्नीनेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली. आरोपीवर कलम ३७६, ५०६ आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Jun 4, 2019, 2:24 PM IST