पुणे -पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लसीकरता वापरलेल्या ‘कोविशिल्ड’ नावावर एका औषध कंपनीने आक्षेप घेतला आहे. नांदेड येथील कुटीस बायोटेक कंपनीने हा आक्षेप घेतला असून, यासंदर्भात पुणे न्यायालयात कंपनीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.
मागील दहा महिन्यांपासून देशभरात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोनावर लस निर्माण करण्यासाठी भारतासह जगभरातील कंपन्या प्रयत्न करत आहेत. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटने देखील कोरोनावर लस उत्पादन सुरू केले असून, सिरमची लस नेमकी केव्हा बाजारात येईल
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीरम इन्स्टिटयूटची कोविशिल्ड ही लस लवकरच बाजारात येण्याची अपेक्षा असताना कुटीस बायोटेक कंपनीच्या संचालिका अर्चना आशिष काब्रा यांनी याप्रकरणी सिरम संस्थेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे.