महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीहून पिंपरी-चिंचवडमध्ये परतलेला एकजण 'पॉझिटिव्ह' - positive found in pune

दिल्लीतील निजामुद्दीन येथे धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील काही व्यक्ती सहभागी झाल्याचे समोर आले होते. यापैकी 23 संशयितांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

pune corona news
दिल्लीहून पिंपरी-चिंचवडमध्ये परतलेला एकजण 'पॉझिटिव्ह'

By

Published : Apr 3, 2020, 11:00 PM IST

पुणे- दिल्लीतील निजामुद्दीन येथे मुस्लीम समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहरातील काही व्यक्ती सहभागी झाल्याचे समोर आले होते. यापैकी 23 संशयितांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. यामधील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून आज आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या या व्यक्तीचे कुटुंब फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील काही व्यक्ती दिल्लीतील निजामुद्दीन येथे इस्लामच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यानंतर 23 संशयितांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या काही नातेवाईकांना देखील क्वारंटाईन करण्यात आले. दरम्यान, दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात आज आणखी एकाची भर पडलीय. गंभीर बाब म्हणजे संबंधित व्यक्तीचे कुटुंब सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील कोरोना बाधितांचा आकडा १५ वर पोहचला असून त्यातील ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकाची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली असून शनिवारी उर्वरित टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details