महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पुण्यातील 'ही' दुकाने उघडण्यास परवानगी - shekhar gaikwad pune

लॉकडाऊनमधून पुण्याच्या मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता येथील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली.

lockdown 4 pune
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात पुण्यातील 'ही' दुकाने उघडण्यास परवानगी

By

Published : May 19, 2020, 8:52 PM IST

पुणे - राज्यसरकारने चौथा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर त्यासंबंधीची नियमावली आज जाहीर केली आहे. पुण्यातील लॉकडाऊनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पुण्यात यापूर्वी 69 प्रतिबंधित क्षेत्र होते. यातील पाच झोन कमी झाले असून, आता 64 प्रतिबंधित क्षेत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जाहीर केले आहेत. तसेच पावसाळ्याशी निगडीत वस्तूंची दुकाने, शेती, मौल्यवान वस्तू आणि बांंधकामासंबंधी दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

यापूर्वी 69 प्रतिबंधित क्षेत्रातील 24 भागात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे हे भाग आता रेड झोनमधून वगळण्यात आले आहेत. तर कोरोनाचा प्रभाव वाढलेल्या नवीन 19 भाग हे रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांनाही आता परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय घरमालकाची परवानगी असेल तर घरकाम करणाऱ्या महिलांना कामावर जाण्याची परवानगीही देण्यात आली आहे. सोसायटी धारकांनी योग्य ती खबरदारी घेऊन घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्याची परवानगी द्यावी, असेही आयुक्त गायकवाड म्हणाले. लॉकडाऊनमधून पुण्याच्या मध्यवर्ती भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता येथील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली. कुठली दुकाने कधी उघडी राहतील यासंदर्भात नियमावली तयार करण्यात येत असून, ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

पावसाळ्याशी निगडीत वस्तूंच्या दुकानांना परवानगी -

पुण्यात बसची वाहतूक ही आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ठेवण्यात आली होती. मात्र, आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शहरातील काही भागात पीएमपीएलच्या वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये पुण्यातील छत्री, रेनकोट, घड्याळे, मौल्यवान धातू, बांधकाम क्षेत्राला साहित्य पुरवणारी दुकाने, शेती संबंधित दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details