महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे परिसरात बांधकामाला परवानगी; मात्र अनेक अडचणी, क्रेडाईचे सर्वेक्षण - बांधकाम पुणे

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेबरोबरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) भागातील २१६ व्यावसायिकांनी भाग घेत आपल्या अडचणी नोंदविल्या.

permission-to-construction-work-in-pune
पुणे परिसरात बांधकामाला परवानगी

By

Published : May 8, 2020, 12:43 PM IST

पुणे- लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही अटी आणि शर्थी घालून बांधकाम प्रकल्पांवर काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात काम सुरू करण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशी माहिती बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी दिली आहे.

प्रशासनाने या क्षेत्राशी निगडीत सर्व विभागांशी एकत्रित चर्चा करीत सर्वसमावेशक निर्णय घेत या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात, अशी मागणीही क्रेडाई तर्फे करण्यात आली आहे. सध्याच्या काळात बांधकाम व्यवसायिकांच्या नेमक्या अडचणी समजून घेण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोच्यावतीने एक सर्वेक्षण करण्यात आले.

सुहास मर्चंट, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष

ज्यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेबरोबरच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) भागातील २१६ व्यवसायिकांनी भाग घेत आपल्या अडचणी नोंदविल्या. यामध्ये प्रामुख्याने काम बंद असल्याने बांधकाम प्रकल्पांवर वास्तव्यास असणाऱ्या मजुरांमधील अस्वस्थता, बांधकाम साहित्याची उपलब्धता, साहित्य प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचविण्यात येणाऱ्या अडचणी, स्थापत्य, अभियांत्रिकी व इतर तांत्रिक बाबी सांभाळणाऱ्या कर्मचारी वर्गाला प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचता न येणे अशा अनेक समस्यांचा समावेश यात आहे.

येत्या काही दिवसात बांधकाम प्रकल्पांमधील बेसमेंट, रिटेनिंग वॉल, अंडरग्राउंड कामे, वॉटर प्रूफिंग यांसारखी मान्सूनपूर्व कामे होणे गरजेचे आहे, असेदेखील सुहास मर्चंट यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details