पुणे -केंद्र सरकारने अर्थसंकल्पात इंधनावरील सेझ वाढल्यामुळे पेट्रोलचे दर 2 रुपये 39 पैशांनी आणि डिझेलचे दर 2 रुपये 44 पैशांनी वाढवले आहेत. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीसंदर्भात पुण्यातील वाहनचालकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
इंधन दरवाढीसंदर्भात पुणेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया - price hike
केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये इंधनावरील सेझ वाढल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीसंदर्भात पुणेकरांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
![इंधन दरवाढीसंदर्भात पुणेकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3769366-thumbnail-3x2-rate.jpg)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या निर्णयाचे स्वागत करणाऱ्या वाहन चालकांच्या मते, केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर विकास कामे करत आहे. देशात विकास काम करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. त्यामुळे सरकारने इंधनावर सेझ वाढवला असला, तरी त्याचे स्वागत करायला पाहिजे, असे काहींचे मत आहे. तर, गरीब जनतेला त्रास होणार नाही, असं काही तरी सरकारने करावं अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे.
त्याप्रमाणेच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महागाई अधिक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे सरकारने इंधन दरवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणीदेखील पुण्यातील वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.